Pages

Thursday, October 26, 2017

Some perspectives on "Kathputli"......by Manisha Vedpathhak

I had posted some perspectives of my friends on the painting "Anonymity".
This time too I played the same game and got really nice views on my 
painting. Though all are in my native language, Marathi. My Indian readers
will surely enjoy. The first one is written by my Mom and the last one
 is by my Sis-in-Law and I feel very proud to share this.

एक निरागस अल्पवयीन मुलगी.कोणत्यातरी  कारणाने खूप खूश आहे.थोडे डोळे मिचकावत  सुखाचा शोध घेतीय.पण तिला वरुन घोंगावणा-या संकटाची चाहूलही लागली नाही.बिचारी.तिला वाटतय वरुन सुखाच्या  आनंदाच्या धारा वाहतायत पण तिलाकाय माहीत याच अश्रुच्या धारा आहेत.बिचारी चिमुरडीचं हा केसाळ हात  काय करील कोण जाणे.तिच कोण रक्षण करील पुढचा क्षण तिच्यासाठी कसा असेल.
---Kamal Potdar


-- Madhavi Apte

रंगरेषा जुळतात कॅनव्हासवर 
उमटलेल्या अगोदर खोल मनातून
तेजाळ, काळोख्या, शीत, उष्ण
स्वतःभोवतीच फेसाळत कुंचल्यातून... 
रंग गहिरे, 
काही ओळखीतले
काही अनोळखी
काही वादळी
तर काही मुक्त उधळणीचे...
साकारताना विनातक्रार
उजळतात नक्षत्रदिवे आठवांचे
चित्रशिल्प अलगद अवतरते
माझ्या नसानसातले... 
करुन देतेओळख माझी 
मलाच पुन्हा नव्याने... 
पाषाणात उगवणाऱ्या 
पिंपळपानासारखी.
---Meera Potdar

"Kathputli" title was given by Gauri Bhagwat .

2 comments:

  1. i like ur thought colour gives feeling to person n feeling is what life is about....nice concept.

    ReplyDelete