Thursday, December 6, 2018

Reflection I and Reflection II....an abstract by Indian artist Manisha Vedpathak

I am collaborating with my long time friend Madhavi Apte. We are to present two paintings and poems for the exhibition. Madhavi has written one poem inspired from my painting and I have a painting inspired from her poem. Here are the pics  of the paintings and the poems:
प्रतिबिंब केवळ .....

प्रतिबिंब केवळ दिसते तुझ्यात
तेही नाही अभंग
प्रतिमा निव्वळ आहे माझी
कळेल कसे अंतरंग

पाहता मी मला तुझ्यात
माझेच दिसे रूप रंग
छबी नाही तुला कोणती
केवळ तुझे तरंग

रंगरूपाच्या उभारल्या भिंती
कळेल कसे अंतरंग
मन अन् दर्शन तुझे वेगळे
तू तरी कुठे अभंग

गंमत केली तुझी खुळ्या मी
मी नाही रे निःसंग
उमगते तुझे अंतरंग म्हणूनच
उठतात ना रे तरंग

___ Madhavi Apte


"Reflection I"
24"x36", Indian ink on canvas


"Reflection II"
24"x24", Indian Ink on canvas

Poem inspired from the above painting:
एकात्म
आतूर होई निसर्ग हिरवा
निळाईत त्या जाई मिसळून
एक जगवतो जीव आणिक
दूसरा तर स्वतःच जीवन

जीव जीवाला मिळतो आणि
उरले नाही आपपर काही
निसर्ग हिरवा लेऊन मिरवतो
समर्पणाची कृष्णनिळाई

प्रत्येकाचे नूर वेगळे
दाखवती ते ठळकपणाने
अस्तित्त्व स्वतःचे जपण्यासाठी
प्रतिबिंब दावी स्व - रूपाने

जीव अन् शीव होई एकात्म
निसर्गाचे हे तर तत्व
जड भौतिक ते राही निराळे
टिकवून त्यांचे अलग अस्तित्त्व
--- Madhavi Apte
No comments:

Post a Comment